(१) अंतःकरण पवित्र ठेवून गुरुचरित्राचे केव्हाही व कितीही वाचन केले, तरीसुद्धा गुरुचरित्र पारायणाची सर्व फळे मिळतात.
(२) ज्या लोकांना ७ दिवसांत पारायण करावयाचे असेल, त्यांनी चांगला दिवस पाहून त्या दिवशी गुरुचरित्र पारायणास सुरुवात करावी. शक्यतो शुक्रवारी पारायण चालू करावे, म्हणजे गुरुवारी समाप्तीचा दिवस येतो, दत्तजयंतीच्या अगोदर सहा दिवस पारायणास सुरुवात करावी म्हणजे दत्तजयंतीला समाप्तीचा दिवस येतो.
(३) सकाळी शक्यतो लवकर उठावे.
(४) आपली रोजची स्नानसंध्यादी कर्मे प्रथम करावीत.
(५) हे अनुष्ठान ज्यासाठी करावयाचे, ते उच्चारून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून, तो हेतू पूर्ण व्हावा म्हणून मी हे अनुष्ठान करीत आहे, असे म्हणून पाणी सोडणे. ह्याला संकल्प असे म्हणतात.
अशा प्रकारे संकल्प करून श्रीगणेश, आसन, कलश, शंख, घंटा, दीप ह्यांची पूजा करावी.
(६) पुस्तकरूपी श्रीगुरूंचे पूजन करावे व ब्राह्मणाची पूजा करावी.
(७) नंतर घरातील सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करावा.
(८) हे सर्व झाल्यांनतर गुरुचरित्र पारायण चालू करावे.