Dwarakanath B Karnik
जन्म : १४ जानेवारी १९०८
मृत्यू : १४ ऑक्टोबर २००५
द्वा. भ. कर्णिक हे १९३१ सालापासून सक्रिय राजकारणात सहभागी होते. १९३५-३६ साली त्यांनी वृत्तपत्र व्यवसायात प्रवेश केला. १९४२ साली रॉयवादी पंथाचे संग्राम हे दैनिक त्यांच्या संपादकत्वाखाली खूप गाजले. व्यक्तिरेखा हे त्यांचे वैशिष्टय होते. मौज ह्या मासिकातून त्यांची व्यक्तिचित्रे प्रकाशित होत.
दिल्लीत ते केसरीचे प्रतिनिधी म्हणून काम करू लागले. त्यांनी प्रभात व केसरी या वृत्तपत्रांत पत्रकारिता केली.
टाइम्स ऑफ इंडिया ने जेंव्हा मराठी आवृत्ती महाराष्ट्र टाइम्स काढली, तिचे कर्णिक हे पहिले संपादक (जून १९६२ ते सप्टेंबर १९६७) होते. त्याआधी गोमंतक ह्या वृत्तपत्राचे ते संपादक होते.
महाराष्ट्र टाइम्स ने मराठी जनतेच्या आशाआकांक्षा, अडचणी, गरज, आर्थिक स्तिथी, ह्या गोष्टींचा सूक्ष्म अभ्यास करून सरकारला त्याची जाणीव करून देण्याचे काम पुढाकाराने केले.
द्वा. भ. कर्णिक यांची विविध विषयांवर १५ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. २००२ मध्ये त्यांना रत्न दर्पण (excellence in media) हा सन्मान देण्यात आला.
**********
D. B. Karnik was active in politics since 1931. He joined the newspaper business in 1935-36. In 1942, "Sangram" a daily newspaper of the "Roy Sect" of Congress became very popular under his editorship. "Personality Portrayals" was his forte. Profile Depictions written by him, were published in "Mauj" magazine.
In Delhi, he started working as representative of a daily called "Kesari". He worked as a journalist for Prabhat and Kesari newspapers.
When the Times of India commenced its Marathi edition as "Maharashtra Times", Karnik was its first editor (June 1962 to September 1967). Prior to that, he was the editor of Gomantak newspaper.
Through Maharashtra Times, the initiatives were taken to make the government aware of the aspirations, problems, needs and financial situation of the Marathi people.
Mr. Karnik has published 15 books on various topics. In 2002, he was awarded the title of Ratna Darpan (Excellence in Media).
**********